Free Gram Sevak Practice Paper : नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित तरी तुमि उत्तरे न पाहता स्वतः प्रश्न सोडवा जेणे करून तुमचा अभ्यास होईल.
हे प्रश्न सराव करून अभ्यास करा जेणे करून परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊ शकाल.
Free Gram Sevak Practice Paper
1) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
B) जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
C) ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत.
D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
Answer: D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
2) महेशकडे 50,000 रुपये असतात जे तो परदेशी फिरायला जाण्याआधी डॉलर 45 रुपये ह्या दराने डॉलरमध्ये बदलून घेतो. परत आल्यावर त्याच्याकडे 200 डॉलर तसेच शिल्लक राहिलेले असतात तर प्रवासामध्ये त्याने किती रुपये खर्च केलेले असतात?
A. 45,500 रुपये
B.41, 000 रुपये
C. 40,000 रुपये
D. 35,000 रुपये
Answer: B.41, 000 रुपये
3) सरासरी काढा.
66, 78, 78, 92, 45 & 67
A.74
B.98
C.71
D.98
Answer: C.71
4) योग्य पर्यायाची निवड करा.
मी उद्या तुझ्याबरोबर ——
A. पेशील
B. येतील
C. येईन
D. पैता
Answer: C. येईन
5) क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
———- पैसे लपविले.
A. तो
B. ती
C. त्याने
D त्याला
Answer: C. त्याने
6) साठीच्या पिक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर किमान 200 मी. असणे आवश्यक आहे.
A. फक्त पायाभूत बियाणे
B. फक्त पैदासकार बिमा
C.प्रमाणित बिया
D. वरीलपैकी सर्व
Answer: A. फक्त पायाभूत बियाणे
7) मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
अ) कलम ३९
ब) कलम ४१
क) कलम ४०
ड) कलम ३८
Answer: क) कलम ४०
8) योग्य शब्द वापरा.
माझ्या घराजवळ ——– आहे.
A. बागे
B. बाग
C. बागेला
D. बागा
Answer: B. बाग
9) नकाशाच्या पट्टीवर, 0.6 सेंमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 35 सेमी असेल, तर वास्तविक अंतर असेल.
A.900 किमी
B. 315 किमी
C. 600 किमी
D. 250 किमी
Answer: B. 315 किमी
Free Gram Sevak Practice Paper
10) वार्षिक चक्रवृधीसह प्रति वर्ष 12% या व्याजदराने 2 वर्षांसाठी रु. 5000 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय असेल?
A. 17.50 रुपये
B. 36 रुपये
C.45 रुपये
D.72 रुपये
Answer: D.72 रुपये
11) जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात?
A) चिठ्ठ्या टाकून
B) गावांच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे
C) आळीपाळीने
D) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार
Answer: C) आळीपाळीने
12) खलील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी कोणती?
A. मित्र – सखा
B. भुंगा – अलि
C. दारा – पत्नी
D. तलाव- सारंग
Answer:
D. तलाव – सारंग
13) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: C. संयुक्त वाक्य
14) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
अ) ग्रामसभा
ब) तहसिलदार
क) गटविकास अधिकारी
ड) यापैकी नाही
Answer: अ) ग्रामसभा
15) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
अ) १०
ब) २०
क) २५
ड) ३०
Answer: क) २५
16) कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
अ) ठिबक
ब) तुषार
क) उपसा
ड) मोकाट पाणी देणे
Answer: अ) ठिबक
17) केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
अ) ३६०
ब) १००
क) २००
ड) यापैकी नाही
Answer: ब) १००
18) डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार
Answer: D. चार
Free Gram Sevak Practice Paper
19) 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून, दोन कार्डे एकाचवेळी काढली. दोन्ही कार्डे राणी असल्याची संभाव्यता काय आहे?
A.1/221
B.221/1
C.3/221
D.221/3
Answer: A. 1/221
20) डांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
अ) गुजरात
ब) आंध्रप्रदेश
क) राजस्थान
ड) महाराष्ट्र
Answer: ड) महाराष्ट्र
READ ALSO